Ad will apear here
Next
मुलांच्या आरोग्यासाठी २०२ पौष्टिक एग रेसिपीज
‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’, असे म्हणतात ते खरेच आहे. कारण अंड्यातून मिळणारे घटक शरीरासाठी अत्यावश्यक असतात. अंड्यातील प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन डीसारखे घटक कायम ठेवून त्यापासून वेगवेगळे चविष्ट पदार्थही बनवता येतात.

कांचन बापट यांनी या पुस्तकात अंड्याच्या तब्बल २०२ पाककृती दिल्या आहेत. ‘ब्रेकफास्ट’ या विभागात झटपट एग, ऑम्लेट, टोस्ट, झटपट टोस्ट बनवण्यासाठीच्या कृती दिल्या आहेत. ‘फुल मील’ या विभागात भुर्जी, स्टार्टर्स, आफ्टरनून स्नॅक्स, भाज्या, करी, पराठे, राईस यांचे अनेक प्रकार शिकायला मिळतात.

‘डेझर्ट’ या विभागात अंड्यापासून पुडिंग्ज, चीजकेक. मरँग्ज,
वॉफल्स, केक्स, स्विसरोल्स आणि पॅनकेक्सच्या कृती समजतात. मग वाट काय पहायची? पौष्टिक नि चमचमीत अंड्याचे पदार्थ करून तर पाहू या!

प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : १०२
किंमत : १४० रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZWKBI
Similar Posts
मुलांच्या डब्यासाठी ४०४ पौष्टिक रेसिपीज वेगवेगळे खाण्याची हौस केवळ मोठ्यांना असते, तशी मुलांनाही असते. मुलांच्या वाढत्या वयात त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला देताना त्यातून त्यांना उरेल अशी ऊर्जा मिळेल आणि एकूणच आरोग्यासाठी ते पोषक असेल, याकडे लक्ष द्यायला हवे. कांचन बापट यांनी या पुस्तकात मुलांना आवडतील अशा पौष्टिक पदार्थांच्या पाककृती सांगितल्या आहेत
मुलांच्या आवडीच्या ३०३ चविष्ट रेसिपीज पारंपरिक पदार्थांबरोबरच चुरचुरीत सिझलर्स, पिझ्झा, पास्ता एवढेच नव्हे, तर वॉफल्स, पुडिंग्स, मफिन्स घरच्या घरी बनवता आले तर किती बहार येईल. कांचन बापट यांनी या पुस्तकात हे पदार्थ घरच्या घरी करण्यासाठी पाककृती दिल्या आहेत.
१०१ ब्रेकफास्ट रेसिपीज् + १०१ बेबी फूड रेसिपीज् रोज उठून ब्रेकफास्टला काय करायचे, हा कोणत्याही घरात पडणारा प्रश्न. कांचन बापट यांनी मात्र, आपली या प्रश्नातून सोडवणूक केली आहे. वर्षभर पुरतील अशा ब्रेकफास्टच्या पाककृती त्यांनी या पुस्तकात दिल्या आहेत.
जिन्नस परदेशी लज्जत स्वदेशी किनवा ब्रेकफास्ट, हॅश ब्राउन्स भरीत, कॉर्न सालसा, कॉर्नमील इडली, मॉंगो पाय, फिलो रोल्स, गार्लिक पिटा, मसाला वॉफल्स, टॉर्टिया बेक, कुसकुस खिचडी, मार्शमेलो डिलाइट.... ही कसली नावे, असे वाटतेय का? आजचा जमाना स्वदेशी नि परदेशी यांच्या फ्युजनचा जमाना आहे. मग आपले खाणेही असे फ्युजन का नको? वसुंधरा पर्वते यांनी अशी फ्युजन डिश आपल्यासमोर पेश केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language